स्ट्रेस
स्ट्रेस हि खूप विचित्र आणि नकोशी feeling असते. असं तुरुंगात सापडल्यासारखं वाटतं . एका विशिष्ट पॉईंट ला डोकं सतत दुखत राहतं . मनाचा एक कोपरा सतत भीतीने भरलेला असतो. डोक्यामध्ये कसले विचार येत राहतात आणि ते खरे होतील अशी anxiety सुद्धा तयार होते. आपलं वागणं च बदलतं .. मृदू कोमल भाषा जणू आपल्याला सोडून जाते आणि चिडचिड , प्रसंगी शिव्या शाप कधीतरी हताश होऊन रडण्यापर्यंत परिस्थिती बिकट होते. मनातून प्रेम वाटत असत लोकांबद्दल , परिस्थिती अजूनही कंट्रोल मध्ये आहे याची जाणीव असते पण हा स्ट्रेस एकदा यायला लागला कि वस्तुस्थिती नेहमी दुधी काचेतून पहिल्यासारखी धूसर दिसते!!
स्ट्रेस यायला लागतो कि आपण तो घेतो? याचं उत्तर प्रत्येकाचे वेगळे असेल. पण माझ्या मते स्त्रीयांना स्ट्रेस ला सगळ्यात जास्त सामोरं जावं लागतं . वाचताना खरं वाटणार नाही पण त्यांना दूध उतू जाण्याचा सुद्धा स्ट्रेस येऊ शकतो. मुलगा किंवा मुलगी शाळेत उत्तर देईल का आणि नाही दिलं आणि शिक्षकांचा राग सहन करावा लागला तर तिला किंवा त्याला काय वाटेल याचा पण स्ट्रेस येतो. देवपूजेची तयारी वेळेत नीट झाली नाही तर? कपडे दिवसभरात वाळले नाहीत तर? संध्याकाळी चहा सोबत मुलांना खायला काही नाहीये आता काय करायचं या साध्या साध्या गोष्टींचा सतत विचार केल्याने तो कधी स्ट्रेस मध्ये convert होतो हे त्यांनाही कळत नाही!!
आपण फार स्ट्रेस घेतोय हे कसं लक्षात येतं ? नॉर्मली पण कपाळावर आठ्या दिसू लागतात, डोक्यातला तो एक बारीक आवाजतला भुंगा कधीही शांत राहत नाही. लहान सहान गोष्टींचा राग तरी येतो किंवा हतबल झाल्याची भावना सारखी मनात निर्माण होते. मुलं आणि नवरा यांच्यावर नेहमीच बरसात सुरु राहते आणि इतर ज्येष्ठांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाहीच. एकाग्रता कमी होते आणि विसराळूपणा वाढतो. तिशीतल्या सगळ्या स्त्रीया कळत नकळत या स्ट्रेस ला आपला कायमचा पार्टनर बनवतात आणि वयोमानानुसार होणारी चिडचिड म्हणून दुर्लक्ष करतात.
आपल्याला स्ट्रेस आलाय हे एक्सेप्ट करता येतं का? आणि नंतर काय होतं हे आपण लेखाच्या पुढच्या भागात पाहू.
Comments
Post a Comment