Skip to main content

Posts

Featured

कहाणी सेल्फ केअर ची

ऐका अप्सरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं , ते अप्सरांचा नगर म्हणून प्रसिद्ध होतं . प्रत्येक घरात अप्सरा नांदत असे. मुलगी झाली कि तिचं कोडकौतुक करीत , उत्साहाने , आनंदाने शेजारी पाजारी उत्सव साजरा केला जाई. साक्षात गौर घरी यावी अशी तिची उस्तवार करीत. तिला शिक्षण दिले जाई . तिला विविध कला शिकवल्या जात. व्यवहारज्ञान , जीवन कौशल्ये , विवेक , सदाचार , आपुलकी , साधन व संपत्तीचे व्यवस्थापन  या गुणांची शिकवण तीला दिली जाई . तिच्या सर्वांगीण विकासाकडे घरातील , प्रत्येक व्यक्तीचे अगदी मनापासून लक्ष असे. अशाप्रकारे सर्व गुणांचा योग्य समतोल साधून तीला वाढवीत , जपीत ....  मूळचीच सुंदर आणि हुशार त्याबरोबर विकसित झालेली मुलगी अगदी स्वर्ग लोकीची अप्सरा भासत असे.  मुलगी मोठी झाली कि सुयोग्य वर शोधून तिचा विवाह होत असे. विवाह प्रसंगी , ' माझ्या नियोजित वधूला मी प्रसंगी मैत्रिणीप्रमाणे वागवेल तर कधी मुलीप्रमाणे काळजी घेईल . सुखा समाधानाने संसार करेल. ' असे वचन वराकडून घेतले जात असे. आणि विवाहानंतर तिच्या नव्या जीवनाला सुरुवात होई.  ' उतणार नाही मातणार नाही , घेतला वसा टाकणार नाही ' असे म

Latest posts

प्रेम , माणूस कि प्रेमाचं माणूस?

तुकडा पडलेले शिंपले

गरमागरम पण हलक फुलक : कर्नाटक पद्धतीचे कुटु आणि खजुराचे सार

मासोळया

नर्कचतुर्दशी

Book Review : One Indian Girl

पहिले प्रेम , लग्नाआधीचे......

महफ़िल

आजी