A poem on Chatrapati Shivaji maharaj

I got a chance to participate in a competition on Hindu samrajy diwas. 
The topic was any incidence in the life of Chatrapati Shivaji Maharaj.
I wrote following poem on that occasion.
Tell me how it is?









आज ऐकू गोष्ट एक 
महाराष्ट्राच्या सिंहाची 
भीत नव्हता कोणालाही 
अशा शूर छाव्याची १


त्यांचं वय होतं सोळा 
केले सगळे मावळे गोळा 
गेले रायरेश्वर गडावरी 
धार रक्ताची धरली पिंडीवरी  २

हि माझी मायभूमी तारेन
पूर्ण जगात तिला भुषवेल 
घेतो आज शपथ तीला 
मी गुलामगिरीतून सोडवेल   ३

खरा केला प्रत्येक शब्द 
केले मावळे सगळे बद्ध 
वापरला त्याने गनिमी कावा 
वीर शिवबा होता हा छावा ! ४

वय होतं  लहान तरी 
महत्वाकांक्षा सागरासारखी  
आपल्या शिवरायांची गोष्ट 
मुलांनो मनात खोल रुजवण्यासारखी  ५

Comments

Popular Posts