बाबांचा mothers' day !

 मागच्या रविवारी फादर्स डे  होता. सगळीकडे कसं  मस्त वातावरण होतं . पावसाळ्याच्या सुरुवातीला फादर्स डे  येत असल्यामुळे सगळ्यांचे सिलेब्रेशन प्लॅन असतोच . 

आपल्या गोष्टीतला बाबा मात्र जरा डिप्रेस्ड होता. हल्ली अरे बाबाच नाही का? १५ -२० वर्षांपूर्वी अहो बाबा होतं , पण आता सर्रास अरे बाबा!

बाबाच्या लहान गोड गोड मुलाने आणि त्याच्या क्युट आई ने आपल्या डॅशिंग बाबासाठी काहीतरी प्लॅन  केला होता. म्हणजे केक तर कंपल्सरी होताच आणि ग्रीटिंग होतं , व्हाटसऍप ला स्टेटस होता... सगळं मस्त मस्त .. 

पण आपला बाबा मात्र एखाद्या नॉर्मल दिवसासारखा च वागत होता. मुलाला वाटलं , असेल काहीतरी , as usual  कामाचं टेन्शन , बॉस चा तगादा! खरं  पहायच तर आपल्या गोष्टीतली आई पण काम करते बरं का, पण तिला नाराज किंवा डिप्रेस्ड राहायची परवानगी नाही , कारण मग सगळं घर च बोअर बोअर वाटायला लागतं . 

बाबाच्या आई- बाबांच आणि मुलाच्या क्युट आईचं आधीच सिक्रेट प्लॅनिंग झालेलं होतं.  

दुपार झाली तसा बाबाच्या आईचा फोन आला , " बाळा मी येतेय रे संध्याकाळी" . 

हा फोन आला आणि त्याच्या अंगात एक नवा उत्साह आला. 

त्याने घर आवरलं  , बाळासोबत जाऊन आईस्क्रिम घेऊन आला.. रोज रोज बाबाला सांगावं लागतं ,'अरे जरा संध्याकाळी फ्रेश होत जा , किमान पाणी तरी मारत जा चेहऱ्यावर! ' पण नाही .. आणि आता मात्र..... 

आजी आजोबा आल्यावर बाळ आणि बाळाचे बाबा असे काही खुश झाले कि विचारू नका! बाबाने फोन बाजूला ठेवला , बाळाने tv  बंद केला आणि आजोबांशी खेळू लागला.. आईने चहा वगैरे ठेवला.. 

सगळं चित्र च बदललं .. 

गोष्टीतला बाबा , बाळाच्या आईकडे पाहून गालातल्या गालात हसला तेव्हाच तीला कळलं कि आज तर बाबाचा mothers' day सिक्रेट प्लॅन मुळे खास साजरा झाला !!



Comments