सिक्रेट सुपरस्टार
सिक्रेट सुपरस्टार
सगळेच असतात नं .... पण कोणी जबाबदारीच्या बुरख्याआड लपतो तर कोणी कामाच्या, कोणी वयाच्या तर कोणी मुलांच्या.. एकावर एक बुरखे चढत चं जातात..
सगळ्यांना सगळं कुठे येतं हो, हि वर एक थाप अजून. आता काय वय राहिलं का?
"कॉलेज मध्ये असताना करायचो मी फोटोग्राफी, कुठे कुठे भटकायला जायचो एक क्लीक मिळण्यासाठी.. पण आता कसलं काय हो! "
"मी तर फेमस होते डान्स साठी. माधुरी च्या गाण्यांवर अफलातून डान्स करत होते.. पण ते तेव्हा!"
'अरे, तुला माहित नाही, माझे मित्र मैत्रिणी फक्त माझ्या नाही तर इतर कॉलेज मध्ये सुद्धा होते, सगळे ओळखायचे मला! आता काय फक्त नातेवाईक, घरकामाच्या बायका आणि गर तर भाजी, किराणा वाला इतक्याच माझ्या ओळखी!"
अरे सोड ना.. गेले ते दिवस.. आता पुन्हा सुरु करुया .. आपण च घेतो न ओढून सगळे बुरखे, मग काढायचे स्वतःच! एक फ्रेश सुरुवात करायला काय हरकत आहे.. कोणीही परफेक्ट नसतं, सगळे 'Work in progress'..... Go slow but keep going.. मग कशाची भीती आणि कशाची लाज!
स्वतःला express करणं जमलं पाहिजे.. पॉसिटीव्ह वाइब्स आल्या नं कि पुन्हा रुळावर येतं सगळं..
जसं कुठपर्यंत धावायचं असं आपण म्हणतो तसं किती वेळ थांबायचं हा सुद्धा प्रश्न विचारा आणि सुरु करा!
एक चाय कि चुस्की और ताजा हो ले...!
Comments
Post a Comment