Skip to main content
स्ट्रेस स्वीकारणे
मागच्या लेखामध्ये आपण स्ट्रेस असण्याची लक्षणे बघितली.
मुळात स्ट्रेस येण्याची प्रोसेस हि इतकी कळत नकळत होते कि आपल्याला लक्षात पण येत नाही कि आपली चिडचिड होतेय किंवा टेन्शन येतंय ते स्ट्रेस मुळे आहे.
आणि कारणं पण फार वैयक्तिक असतात. individualized!
१. सगळ्यात जास्त सांगितलं जातं ते ऑफिस च्या कामाचं टेन्शन
२. त्यानंतर नंबर लागतो आर्थिक परिस्थिती चा
३. आणि तिसरं महत्वाचं कारण असतं कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अपेक्षा
यामध्ये स्पेसिफाय करता येतं , बॉस त्रास देतो , कामाच्या डेडलाईन्स असतात , पगार वाढत नाहीये , लोन च टेन्शन आहे. घरात आजारपणं सुरु आहेत , मुलं ऐकत नाही , मुलाचं लग्न ठरत नाही , मुलीला मुलबाळ होत नाही वगैरे वगैरे. हि macro कारणं हळूहळू micro होऊ लागतात.
कामवाली बाई आली नाही , नेहमीची ट्रेन चुकली , प्रोजेक्ट सबमिट करताना एखाद दुसरी स्पेलिंग मिस्टेक झाली वगैरे वगैरे... खूप लहान लहान गोष्टी असतात.
मेंदूतला तो एक स्ट्रेस नावाचा किडा एकदा का वळवळु लागला कि मग काही खरं नसतं .
मुळात आपण स्ट्रेसफुल राहणं इतकं normalise केलंय न कि मग ' संसार म्हणलं कि हे होणारचं ' असं बोलायला सुरुवात होते. जे काही अंशी बरोबर पण आहे. पण या भावनांचा निचरा होणे जो कि एकदम सोपा उपाय आहे , तो होत नाही कारण आपल्या आजूबाजूला शेअर करायला कोणी नसतं ! त्यामुळे या जुन्या काही वाक्प्रचारांचा वापर आपण कटाक्षाने टाळायला हवा आणि स्ट्रेस येतोय हे मान्य करायला हवं .
माझ्या ओळखीतल्या एका बाईंना मुलाच्या शाळेच्या वेळेचा स्ट्रेस येतो. म्हणजे शाळा दुपारच्या सत्रातली असो नाहीतर सकाळच्या सत्रातली ; त्यांना ती वेळ पाळायची म्हणलं कि खूप टेन्शन येतं . मग मुलावर आरडाओरडा, रडारड , धावपळ , अन्नाची सांडलवंड असे अनेक अपघात होतात , काम वाढतं , शारीरिक थकवा येतो .... हि साखळी न तुटणारी आहे.
मला स्वतःला घरी पाहुणे येणार म्हणलं कि स्ट्रेस येतो. माझ्या या वाटण्याचं कारण , 'I am not good enough' असं वाटणं हे आहे. माझं घर , माझी नोकरी /व्यवसाय , माझ्या मुलांना लावलेल्या सवयी याबद्दल कोणी आक्षेप घेऊ च नये असं मला वाटत! जे सर्वस्वी चूक आहे. पण तरीही या सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे कि मी ' मला असं वाटतंय हे एकसेप्ट केलं आहे', मला याचा त्रास होतो हे मी स्वतः ला सतत सांगते , त्यामुळेच तो दूर व्हावा असं सुद्धा मला वाटत.
सांगायचं हेतू काय , कि आपल्यावर होणारे परिणाम किंवा आपल्या वागण्यात झालेले बदल आपण नीट लक्ष देऊन बघितले तर आपल्याला लक्षात येतं कि काहीतरी चूक आहे , मग राहतो प्रश्न फक्त ते स्वीकारायचा ! आणि एकदा स्वीकारलं कि ते बदलायला वेळ लागत नाही!
Photo courtesy : Google
विभावरी विटकर
Comments
Post a Comment