स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

स्ट्रेस ची व्याख्या समजून घेऊन आपण त्याची कारणे सुद्धा पाहिली. कारणे समजली कि 'स्वी'कारणे सुद्धा आलेच. 

आता स्ट्रेस येतो हे आपण स्वीकारले आहे हि खूप चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी स्वतःला नक्की शाबासकी दिली पाहिजे. 


आता ? पुढे काय?

आता काही नाही , जो गोष्ट आपल्याला नको आहे ती दूर करायची , ती निर्माण होणारी कारणे किंवा घटना घडायला लागल्या कि स्वतःला सावध करून आपण त्या  झोन मध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची. 


म्हणजे कसं ?

काही सोप्या गोष्टी आपण करू शकतो, जसं कि ,

१. स्ट्रेस घालवायला चहा पितो जरा डोकं हलकं होईल 

२. एक सुट्टा मारून  येतो म्हणजे डोकं चालू लागेल 


असा विचार करणं सोडून च द्यायचं.. मग करायचं काय?

इमिडिएट उपाय म्हणजे 

स्ट्रेस घालवायचा तर त्याचं  कारण एका कागदावर किंवा वहीमध्ये लिहून काढायचं .. लिहिता लिहिता असं होईल कि लिहून होईपर्यंत तुमचं कारण इतकं लहान वाटायला लागेल कि आपण याचा स्ट्रेस घेत होतो असा प्रश्न तुम्हीच स्वतः ला विचाराल . 

अजून एक हमखास काम करणारा उपाय म्हणजे १० श्वास शांतपणे घ्यायचे. deep breathing करायचं . 

हा उपाय काम करतोय कि नाही हे पाहण्यासाठी , श्वास घेताना नाडीचे ठोके मोजायचे. पहिल्या श्वासाला जोरजोरात चालणारी नाडी , दहाव्या श्वासापर्यंत अतिशय शांतपणे धावत असते. तेव्हा च आपले मनही शांत होते आणि पुढचा मार्ग दिसू लागतो. 


आता थोडी जास्त वेळ घेणाऱ्या पण हमखास रिझल्ट देणाऱ्या अशा काही पद्धती बघू. 


यात आपल्याला स्वतः सवयींमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. 


१. अरोमाथेरपी म्हणजे सुगंधी द्रव्यांचा वापर करून बनलेल्या वस्तू जसं कि साबण किंवा कँडल वापरणे 

२. नियमित व्यायाम करणे 

३. ओमेगा ३ असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करणे (मासळी , अंडी , जवस , अक्रोड , सोयाबीन इत्यादी)

४. ऑनलाईन चॅटिंग पेक्षा मित्र मैत्रिणींना भेटून गप्पा मारणे 

५. योग्य वेळी नकार द्यायला शिकणे 

६. कॉन्सलर किंवा थेरपिस्ट ची मदत घेऊन पाहणे. 


विभावरी विटकर 


Comments

Popular Posts