कोपरा
मनातला एक कोपरा
ठेवलाय तुझ्यासाठी राखीव
हळवा कोमल जरासा
त्या हळव्या कोपऱ्याला
उजळवतात तुझ्याच आठवणी
अंधुक आणि कातर मनातली गाणी
कोपरा असतो अलवार
बराचसा दुर्लक्षित
कवडस्याच्या उन्हात आपलं रूप न्याहाळीत
वर्तमानाच तेज तो
टाळत राहतो बापडा
भूतकाळाच्या चांदण्याचाच
त्याला लागलाय लळा
या कोपऱ्याला मी
तशी नेहमीच टाळते
आडबाजूने जाताना फक्त नजर तिरकी करून पाहते...
सांगत नाही कोणाला
हा कोपरा माझा आहे
हळवा कोमल जरासा तुझ्यासाठी राखीव ठेवला आहे
तुझ्यासाठी राखीव ठेवला आहे!
Wow!
ReplyDelete