खेळ
खेळ म्हणलं कि शाळेतल्या त्या रोमांचक स्पर्धा आणि त्यानंतर ची भांडण आणि खुन्नस आठवते कि नाही!! अशा खूप गोष्टी आपण च आपल्या नजरेआड लोटतो.
मध्यंतरी, खेळाडूंच्या चरित्रावर चित्रपट काढायची लाट आली होती. बघूया कोणते:
१. मेरी कोम
२. दंगल
३. भाग मिल्खा भाग
४. सांड कि आंख
५. M.S. Dhoni
६. अझहर
७. Sachin : A billion dreams
८. सूरमा
९. गोल्ड
१०. ८३
या सगळ्या चित्रपटांमध्ये हेच पाहायला मिळालं कि जवळपास सगळेच खेळाडू हे एकतर 'स्वप्न होतं म्हणून' किंवा 'अकस्मातपणे' खेळाडू झाले. त्यांनी ठरवलं , कष्ट घेतले, आणि ते achieve केलं. खेळाडू म्हणून कोणीही त्यांचं करिअर प्लॅन केलं नाही.
किती अनास्था आहे आपल्याकडे खेळांबद्दल ! अंजली भागवत, पंकज अडवानी, साईना नेहवाल किंवा नवीन क्रिकेटर्स यासारखे किती जण ठरवून स्पोर्ट्समन झाले!
एका Mutual funds च्या जाहिरातीत सचिन म्हणतो तसं , "Mutual fund हो या क्रिकेट, One should be ready to take the risk!"
म्हणूनच खेळाकडे, क्रीडाप्रकारांकडे करिअर म्हणून हि बघितले गेले पाहिजे.
खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन:
सगळ्या खेळांतून काही ना काही शिकायला मिळतंच. व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडाप्रकारांचा खूप मोठा वाटा असतो!
मग ते बैठे खेळ असो कि मैदानी कि indoor sports .....
बुद्धिबळासारख्या खेळामध्ये, प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यातील गोष्टी ओळखून त्यानुसार खेळायचे अनोखे skill विकसित होते.
कॅरम मुळे एकाग्रचित्त ठेवायची सवय लागते
कबड्डीमुळे श्वासावर नियंत्रण, चपळाई आणि आक्रमकपणा हे skills विकसित होतात.
लंगडी, खो - खो हे खेळ तर चपळाई आणि strategy या दोन गोष्टींवर च अवलंबून आहेत.
याशिवाय इतर फायदे आहेतच:
१. खेळांमुळे समूहामध्ये, संघामध्ये राहायची भावना वाढते
२. तग धरून ठेवायची आणि आपली शक्ती वाढवायची सवय लागते
३. स्वतः च्या भावनांवर control ठेवायला शिकता येते
४. शरीराची लवचिकता वाढते
५. स्वतःवरचा विश्वास वाढतो
६. चिकाटी आणि एकनिष्ठता या भावना वाढतात
७. सतत नवीन शिकण्याची सवय लागते
८. स्पर्धेमध्ये सुद्धा सकारात्मक रहायला शिकता येते
९. हृदयरोग, रक्तदाब, सांधेदुखी, व इतर मानसिक आजारांना दूर ठेवता येते.
१०. आपले डोळे, हात, पाय आणि इतर शारीरिक क्रिया या एकाच वेळी समन्वय साधून करणे शिकता येते
This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.
Comments
Post a Comment