लहान मुले आणि पालकांबद्दलची काही निरीक्षणे:

This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.

लहान मुले आणि पालकांबद्दलची #स्पंदन ची काही निरीक्षणे:

जवळपास वर्षापेक्षा अधिक काळासाठी या क्षेत्रात काम केल्यावर , Child counselling चा रीतसर अभ्यास केल्यावर लक्ष आलेले काही मुद्दे इथे देत आहे.
१. पालक आणि पालकत्व या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचे वेगवेगळे combination होऊन parenting styles बनतात.
२. मुलांचे प्रश्न आणि आईवडिलांचे प्रश्न वेगवेगळे असतात , जरी ते एकमेकांसोबत राहात असले तरीही....
३. मुलांनी आई वडिलांचं ऐकलं किंवा नाही ऐकलं तरी आई वडिलांना मुलांचं ऐकावंच लागतं
४. Counselling ची गरज मुलांपेक्षा पालकांना जास्त असते ,कारण parenting त्यांच्यासाठी stressful असतं , पण मुलांसाठी childhood आनंददायी असतं.
५. ज्याप्रमाणे मुलं इतर लोकांचं सांगणं लवकर ऐकतात , स्वीकारतात , त्याप्रमाणे पालकसुद्धा सतत इतर लोकांच्या मुलांशी comparison करतंच असतात!! (कसं वाटलं वाचून?)
६. स्त्री-पुरुष समानता यावर कितीही चर्चा झाली , तरी मुलांना आई हवीहवीशी वाटते. हे युगानुयुगं असंच राहणार. सगळ्या जगाने मान्य केली, तरी स्त्री -पुरुष समानता म्हणजेच; आई आणि बाबा समान असतात हे मुलं कधीच मान्य करणार नाहीत!
७. मुलांची वेगळी personality जन्मतःच असते. नंतर पालकांच्या संगोपनामुळे ती develop होते म्हणजे तीला एक दिशा मिळते, मूळ स्वभाव निसर्गदत्त असतो.
८. गमतीचा भाग सोडला ; तरी, खरंच आई-वडिलांना पालकत्वाचा असा कितीसा अनुभव असतो? मुलांच्या वयाएवढाच ना? मैत्रीपूर्ण parenting होऊ शकतं !
९. आई ला मुलं जरा जास्त त्रास देतात , सारखं granted धरतात , पण आईचं लागते मुलांना.. थोडासा त्रास झाला, रडारड , आरडाओरडा झाला कि manage करता येत नाहीये हि तक्रार आई-मुलापेक्षा इतरांचीच जास्त असते.
१०. ज्या पालकाकडे मुलांचा कल जास्त असतो , त्याची जबाबदारीसुद्धा मोठी असते. वडिलांनी हा मुद्दा नेहमी लक्षात घेतला पाहिजे!

Comments

Popular Posts