आजी - नातू

अशाच एका दुपारी

एक मुंगी बिचारी

🐜
धावतपळत कामात मग्न
घेऊन निघाली आपले अन्न 🍥
तिला माहित नव्हते तिचे रोजचे काम
ठरेल कोणासाठी चर्चेचा विषय आम
एक आजी आणि तिचा नातू
बसले होते सहज चहाच्या वेळी☕️☕️
आजी: अरे बघ बघ ती मुंगी कसे तांदूळ घेऊन निघाली आहे. किती जड आहे तो तांदुळाचा दाणा 😥😥
नातू: अग थांब थांब.. मला टाचणी दे!📍📌
आजी: क्काय? 😳अरे बघ तरी किती कष्ट करतेय! बिचारी!
मुंगी : कोण? 🐜मी? oh yes !!😎🤩
नातू: बघू बघू
आजी: तीला माहितीये ना! इथे चिंटू खाऊ देतो.... शेव , बिस्कीट, डाळिंब, बोर्नव्हिटा, चिप्स.. येते मग खायला 🍟🍞🍫🥤
मुंगी: हो S S आजी तुमचं बरं लक्ष असतं हं 🙎‍♀️
आजी: तिच्याकडे स्टोरेज असतं बरं .. किचन मध्ये डबे असतात न आपले तसंच ती पण साठवते सामान
नातू: हो का? delivery असते का amazon सारखी?🛒
आजी: कार्ट्या अरे कसलं amazon , कसली delivery , तीच करते बरं सगळं .. शोधा - उचला - साठवून ठेवा 🐜🐜🐜
मुंगी: मुंगी जन्मा ही तुझी कहाणी! 🥺आजी emotional झाली रे... 🤯
आजी: कसा उचलतात रे या मुंग्या दसपट भार ?🙆‍♀️
नातू : अग swiggy वाला माणूस पण उचलतो आजी!👨‍🌾👩‍🍳💁‍♂️
आजी: गप रे swiggy वाल्या....
मुंगी: आजी अहो बरोबर बोलतोय..🙄 माझं काम च आहे delivery चं .. बाकीचे दुसरी कामं करतात.. ते कामं आपण नसतो करत!!!
नातू : आजी टेन्शन नको घेऊ. आज नाही सांडणार मी काही! 🥳🤗🤗🥳🤗🤗
आजी : शहाणं माझं बाळ ते! 🤝👏👌
मुंगी : लैच शहाणी आजी गं !!🥴👵

Comments

Popular Posts