सण-समारंभाचे जेवण आणि फूड पिरॅमिड!

मागच्या दोन लेखांमध्ये आपण खालील विषय हाताळले सण समारंभाचे बदलते स्वरूप आणि घरगुती सण-उत्सवातून मुलांना काय शिकवता येईल.

जुन्या व नव्या ची सांगड घालणे हा प्रत्येक काळाचा मूलमंत्र आहे. जुन्या चा आधार घेऊन त्यात कालानुरूप बदल घडवणे व सर्वांगीण विकास साधणे हे प्रत्येक तरुण पिढीचे कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे. कारण जून्यातूनच नव्या चा उगम होत असतो. नवीन काहीतरी करण्यासाठी त्याला बेस हा जुन्या गोष्टींचाच असतो.
कालानुरूप जसे स्त्रियांनी विकतचा फराळ आणणे , क्वचित पुरणपोळ्या लाडू व पूर्ण स्वयंपाक बाहेरून आणणे हा बदल स्वीकारला , त्याच प्रमाणे या न्यूक्लियर फॅमिली मधल्या आयांनी किंवा स्त्रियांनी आपल्याला मदत व्हावीे म्हणून त्यांच्या मुलांना कामाची सवय का बरं नाही लावली?
आज काल कोणी कोणाकडे जात नाही , कोणी फराळाचं खात नाही असं म्हणत आपलं काम वाचवायचा तर प्रयत्न करत नाही ना?
दिवाळीमध्ये एकीकडे काजुकतली सोनपापडी यांचे पाकीटं गिफ्ट म्हणून द्यायचे आणि दुसरीकडे करंजी, बेसनाचे लाडू , घरची शेव- चकल्या या पदार्थांना नाकारायचे !! तुम्ही म्हणाल आज असा नकारात्मक सूर का बरे लावला ? कारण चांगल्या गोष्टी नाकारायची तूम्हा-आम्हाला जणू सवयच लागली आहे...
आपण फार knowledgeable आणि advanced आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळे डायट follow करतो आणि त्यातून मुलांना व स्वतःला कधी न्यूट्रीशन खूप जास्त तर कधी कमी पडत आहे ह्याची जाणीव होत नाहीये.
व्होकल फॉर लोकल व्हायची हीच वेळ आहे कशी ते मी सांगते तुम्हाला,
गौरी-गणपतीचा सण सुरू आहे आणि गौरी पूजनाच्या दिवशी मोठा स्वयंपाक असतो मोठा स्वयंपाक हा खुपच साग्रसंगीत असतो.
अश्या प्रकारच्या स्वयंपाकाचे पूर्ण ताट खाली फोटोमध्ये दिले आहे.
कोणत्याही डाएटचा बेस असतो फूड पिरामिड या फूड पिरॅमिड नुसार आपल्या खाण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचे वेगवेगळे गट केले आहेत त्यानुसार ज्यातून कार्बोहाइड्रेट मिळतात असे पदार्थ सगळ्यात जास्त सर्विंग मध्ये देणे अपेक्षित आहे भारतीय जेवणात किंवा महाराष्ट्रीयन जेवणात कार्बोहायड्रेट मिळतात ते पोळी भाताचे प्रकार ह्या मधून आणि सणाच्या दिवशी जेवण असते पुरणपोळी किंवा तांदळाची/ रव्याची खीर किंवा कोणत्यातरी पिठापासून बनलेले पक्वान्नं ज्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात
त्यानंतर उजव्या हाताला असतात त्या भाज्या, फूड पिरामिड नुसार भाज्या आणि फळे यांचे प्रमाण पाच सर्विंग मध्ये असणे अपेक्षित आहे म्हणूनच मग एक पातळ भाजी एक सुकी भाजी आणि एक मिक्स भाजी अशा सोळा भाज्या मिक्स करून त्याच्या साधारणपणे तीन भाज्या बनवल्या जातात त्याचबरोबर फळांची कोशिंबीर काकडीची कोशिंबीर हे सर्व त्यात असणारे पदार्थ आहेत
फूड पिरामिड मध्ये तिसरा नंबर येतो प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच डाळी, दूध आणि दही अशा पासून बनवलेल्या पदार्थांचा, त्यासाठी आपल्याकडे वाटली डाळ, कढी तसेच एखादी दह्यातली कोशिंबीर यासारख्या पदार्थांचा समावेश असतो याबरोबरच चटणी, तिळ-शेंगदाण्याचे पंचामृत, मेतकूट यासारख्या पदार्थांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स डाळी पोटात जातात यातून प्रोटीन्स आणि कार्बोहाइड्रेट या दोन्हीची रिक्वायरमेंट पूर्ण होते.
त्यानंतर सगळ्यात कमी असतात ते फॅट्स म्हणजे तेल तूप इत्यादी, म्हणूनच आपण तळलेले पदार्थ जसं की भजे वडे पापड कुरडया हे डाव्या हाताला अगदी एखाद दुसराच वाढतो आणि गुड फॅट्स साठी साजूक तुपाची धार वरणभातावर आणि पुरणपोळीवर.
फूड पिरामिड नुसार वॉटर म्हणजे पाणी तुम्ही कितीही प्यायला तरी चालतं म्हणूनच मग पुन्हा उजव्या हाताला मठ्ठा ताक यासारखे पदार्थांच्या वाट्या असतात त्याचबरोबर संपूर्ण जेवण पूर्ण केल्यानंतर पान स्वच्छ केल्यानंतर मीठ आणि लिंबू हे पदार्थ असतात आपल्या आयुर्वेद शास्त्रा नुसार हे दोन्ही पदार्थ पाण्यामध्ये टाकून पिले की छान पचन होते.
आता #स्पंदन कडून दिलेल्या खालील टिप्स नेहमी लक्षात ठेवा.
१) सणासुदीला बनवले जाणारे ऋतू कालानुरूप पचणारे वेगवेगळे पदार्थ हे न कुरकुर करता मुलांना पूर्णपणे स्वच्छ करायची सवय लावा.
२) प्रत्येक पदार्थ चाखून बघायची सुद्धा सवय लावा मी हे खात नाही मला हे नको मला ते नको मला फक्त भजी वाढ मला पापड जास्त वाढ मला रायते कोशिंबिरी बिलकुल नको असे चालणार नाही हे निक्षून सांगा.
३) घरातील मोठ्यांच्याच फार आवडी निवडी असतील तर लहान मुलांकडून जास्ती अपेक्षा काय करणार? मुळात ज्याचा त्रास नसेल allergy नसेल ते सर्वच एकदा वाढलेले संपवलेच पाहिजे.
४) आपली खाद्य संस्कृती, नेवैद्य संस्कृती हे संपूर्ण आहारशास्त्र आहे ते फूड पिरामिड चे उत्तम उदाहरण आहे म्हणूनच कुठलाही दिखाऊपणा न करता मुलांना संपूर्ण पान स्वच्छ करायची सवय लावा आणि आपल्या पदार्थांचे महत्त्व पटवून द्या हीच स्पंदन कडून कळकळीची विनंती.


This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.

Comments