मुलांचं काही कळत नाही
हल्ली आमच्या शेजारच्या मेहतांच्या घरातून सारख्या या विचारणा होत असतात;
" मला जीवनसाथी मध्ये नाव रजिस्टर करायचंय आहे मम्मा !"
" मला ना जिम मध्ये जाऊन खूप कष्ट करायचेत , घाम आणायचाय "
" डॅड्डु ,लॉन्ग ड्राइव्ह ला जाऊ ना , पिकनिक ची बॅग घेऊन"
" मला स्कुल साठी तयार करणं हि तुमची जबाबदारी आहे "
शेवटचं वाक्य वाचून कळलंच असेल कि शाळेत जाणाऱ्या त्यांच्या मुलाचे हे वक्तव्य. आणि शाळेत म्हणजे कितवीत विचारत असाल तर तो आहे बालवर्गात म्हणजे Sr . KG. मध्ये.
मुलांचं समज यायचं वय कमी झालंय असं आपण सगळ्यांनी वाचलं आणि ऐकलं असेल. खरं , ही मुलं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं खूप बारीक निरीक्षण करतात आणि त्यावर seriously विचार करतात. ऐकून सोडून द्यायची कला त्यांना अजून अवगत झाली नसते. जे दिसतंय , ऐकू येतंय तेच बरोबर असं वाटण साहजिक च आहे! आणि यावरून जर रागवलं तर डायलॉग सुद्धा ठरलेले;
" देवा मला या फॅमिली मध्ये का टाकलंस रे?"
" देवा मला एकदा हे घर सोडून जायचंय , पण ना मी मम्मा ला miss करेल , तिची आठवण येईल"
वाचून किंवा ऐकून हसू येतं ना? पण हसून सोडायची गोष्ट नाही हि. मुलांच्या वागणुकीतला बदल तुम्ही टिपता का? सहा महिन्यामध्ये सुद्धा मुलं खूप काही शिकू शकतात. स्वभावात बदल होऊ शकतो.
Sr.KG. मध्ये म्हणजे साधारण ५ - ६ वर्षांची झाली कि मुलांना स्वत्वाची जाणीव होऊ लागते. माझा आवडीचा रंग, माझे कपाट , माझे अभ्यासाचे टेबल. काही मुलींना आवडीचे ड्रेस, मेकअप चे साहित्य हे सगळं समजू लागतं. एखाद्या व्यक्तीकडे ते आदर्श म्हणून पाहू लागतात. आदर्श वगैरे नाही समजत , पण तसं वागायचं . राहायचं हे समजतं! आणि ती असते बहुतेक शेजारचा दादा किंवा ताई , एखादा सिनेनट. ( आपण त्यांना, 'सिनेनटांपेक्षा दुसरे हिरो सुद्धा आहेत हे याची जाणीव करून द्यायला कमी पडतोय ' हे पालकांच्या लक्षात यायला हवे)
मग सेम टू सेम त्या व्यक्तीसारखं राहायचा प्रयत्न करतात. आई- बाबांनी विरोध केला कि घरात आरडा ओरडा , वस्तू फेकणे , नैराश्य आल्यासारखे वर दिलेली वाक्ये बोलणे हे सुरु होतं . त्याचा अर्थ आणि गांभीर्य भले कळत नसेल पण हे समजतं की काय घडलं कि कशी reaction द्यायची आहे!
या वयात अजून एक प्रामुख्याने दिसणारी गोष्ट म्हणजे आजी आजोबांबद्दल थोड्या वेगळ्या भावना निर्माण होऊ लागतात. इतके दिवस जे आजी आजोबा अगदी जवळचे असतात , त्यांना वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात होते. त्यांच्यासोबत बोअर होऊ लागतं. यामुळे घरात तणाव निर्माण व्हायची शक्यता असते!
या वेळी पालकांनी काय करावं? तर Good listener ची भूमिका वठवावी . मुलांचं म्हणणं पूर्ण आणि शांतपणे ऐकून घ्यावं. बोलताना लक्ष फक्त त्यांच्याकडे च द्यावं. आणि मुख्य म्हणजे त्यांचं मत ग्राह्य मानावं !! फक्त इतकं जरी केलं तरी त्यांचं वाढलेलं temper कमी होईल. त्यांना महत्व देतोय असं वाटेल! आणि खरं तर त्यांना इतकंच हवं असतं , बस्स!
#parenting
Comments
Post a Comment