Crazy kids

 सध्या ३ ते ७ या वयातल्या मुलांना बघितलं तर तुम्हाला जाणवेल कि ती फार वळवळी झाली आहेत! एकही काम न हलता डुलता करतंच नाहीत. दूध पितांना, जेवतांना, दात घसताना आणि अगदी टॉयलेट सीट वर पण यांची हालचाल सुरूच! कधी कधी जुही चावला सारखं विचारावं वाटतं! ' तुम ट्रेन मी पैदा हुए थे क्या?'

असं काय असतं जे याना स्थिर बसू देत च नाही!
अंघोळ करताना अंगावर पाणी उडवतील , जेट स्प्रे मारून पाऊस पाऊस खेळतील! बुटाच्या लेस बांधताना पण पाय इतका हलवतील कि बास! कंटाळून जातात पालक!
या अशा एरवी ऍक्टिव्ह असणाऱ्या मुलांना व्यायाम करा म्हणलं कि मात्र पाय दुखतात. आसनं करता येत नाहीत , मांडी घालून बसा म्हणलं कि कंटाळा येतो. 'पाठीचा कणा ताठ' हि तर कन्सेप्ट च हळूहळू नाहीशी होते कि काय अशी भीती वाटू लागली आहे! मात्र डान्स करण्यासाठी वाटेल तशा उड्या मारायला सगळे एका पायावर तयार! हे असं का आहे !
हि च गत भाषेची! हिंदी , इंग्रजी चे कठीण शब्द अगदी तोंडात बसलेले , पण मराठी आणि संस्कृत बोलताना बोबडी वळते. ऍडव्हर्टाइझ , जिंगल्स , गाणी तोंडपाठ , पण एखादी सुंदर कविता वाचून पाठ करायला सांगा , नाही च येत इंटरेस्ट त्यांना ! वेगवेगळ्या तर्हेने मन वळवायचा प्रयत्न केला तरी तीच कथा. खूप पालकांना याबद्दल बोलताना ऐकलंय कि मुलं अशी फार चंचल आहेत म्हणून!
बरं हि मुलं मठ्ठ नाहीत बरं का , कि सांगितलेलं समजत नाही. उलट त्यांची चॉईस त्यांना जास्त कळते. टिकटॉक किंवा तत्सम शॉर्ट व्हिडीओ बनवतांना त्यांची क्रिएटिव्हिटी दिसून येते. डान्स स्टेप शिकताना त्यांची आकलनशक्ती दिसून येते. इंग्लिश बोलताना त्यांची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती दिसून येते! पाठांतराबद्दल तर काय बोलायचं! रट्टामार आहेत सगळे , कन्सेप्ट क्लीअर करायची कन्सेप्ट च कमी झाली आहे हल्ली!
व्हॉइस सर्च , ईमोजी , मॅप्स, फोटो कोलाज , व्हिडिओ एडिटिंग यात हे प्रवीण. पण पाढे , गणिताच्या गमती जमती , गोष्टी सांगणे , लोकांशी बोलणे ही कामे महाकठीण या मुलांसाठी!!
हा असा विरोधाभास का दिसून येतोय मुलामध्ये याचा अभ्यास सध्या मी करतेय ! बघूया काही समजतंय का!




This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.

Comments

Popular Posts