This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.
अगदी काल परवाची घटना आहे. एका हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबातील मुलाने मोबाईल फोन साठी हट्ट केला. मुलगा १३ वर्षाचा. आई भाजी विकते कि तत्सम काही काम करते. वडील पण असंच काहीतरी करतात. ऐपत म्हणजे आर्थिक क्षमता नसतांनाही आईने हट्टापायी फोन घेऊन दिला रु. १५,००० चा.
बरं फोन मिळाल्यावर मुलाने काय करावं? युट्युब वर गळफास कसा घ्यायचा याचा व्हिडीओ पहिला आणि प्रात्यक्षिक करून पाहिलं!!! पुढे काय झाले असेल हे मला लिहवत नाही. तशी कल्पना हि करवत नाही. पेपर मध्ये अगदी छोटीशी आणि टीव्ही वर अगदी धावती बातमी दाखवली होती. पण घटनेची व्याप्ती त्या कुटुंबाच्या आयुष्यात किती मोठी आहे याची कल्पना सर्व पालकांना करता येईल.
असे मनात उसळ्या मारून वर येणारे विचार जेव्हा कृतीत उतरतात तेव्हा काहीही घडू शकतं याचं हे उदाहरण. त्याला इंग्लिश मध्ये impulsive behaviour म्हणतात. ऑनलाईन खरेदी करताना, प्रदर्शनामध्ये किंवा मोठ्या मॉल किंवा शोरूम मध्ये जातो तेव्हा पण हे impulsive behaviour चं खरेदी करायला आपल्याला भाग पाडत. तेच चहाची हुक्की आली , सिगरेट प्यावीशी वाटली किंवा ड्रिंक करावंसं वाटलं कि करायला भाग पाडत . त्या एक - दोन क्षणांमध्ये आपण विचारच करू शकत नाही , थेट कृती करून मोकळे होतो. आणि मग नंतर लक्षात येत की आपण हे उगाच केलाय. याची गरज नव्हती.
चहा, सिगरेट किंवा वस्तू याबाबतीत आपण इतका गंभीरपणे विचार करत नाही कारण ते आयुष्याला डायरेक्ट अपायकारक नाही. पण फाशी? अशी जीवघेणी कृती कशी काय करून बघावीशी वाटत असेल? असं आपल्याला बातमी वाचून वाटतं.
याचा अर्थ असा कि , स्लो पॉयझनिंग परवडलं जहाल विषापेक्षा असा विचार आपण करत आहोत!
हे impulsive behaviour काही आधुनिक युगाची देणगी नाही. हि देणगी आहे अपूर्ण इच्छांची, अवास्तव महत्वाकांक्षांची आणि योग्य मार्गदर्शनाची. पूर्वी अशा घटना कमी व्हायच्या कारण योग्यायोग्यतेची जाणीव करून द्यायला आजूबाजूला माणसे असत. एका कुटुंबाची साचेबद्ध अशी वागण्याची पद्धत होती जिला रूढार्थाने आपण रूढी व परंपरा असे म्हणतो. जसा प्रगतीचा वेग आणि कुटुंबातल्या सदस्यांची संख्या कमी झाले तसे व्यक्तिस्वातंत्र्य वाढले. बेचैनी वाढली, त्यातून स्पर्धा वाढली. आणि सगळ्यात वाईट म्हणजे स्पर्धा कशाशी आणि कोणाशी करायची याचे परिमाण बदलले. आणि म्हणून हे impulsive behaviour मान वर काढू लागलं. आणि विरोधाभास म्हणजे जोखीम पत्करण्याची क्षमता ( Risk taking capacity ) मात्र कमी झाली!
पालकांनी जरा विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल कि त्यांनी ज्या वस्तूंशिवाय संपूर्ण आयुष्य काढलं , प्रगती केली त्या वस्तूंशिवाय त्यांची मुलं राहू शकत नाहीत. आणि याउलट ज्या सवयींशिवाय जगण्याची कल्पना सहन होत नव्हती त्या सवयी मुलांना नाहीतच! आणि हे जात गोत धर्म पंथ यावर मुळीच अवलंबून नाही! सांगायचा मुद्दा एक च कि योग्य समुपदेशन सर्व वयाच्या लोकांना गरजेचे आहे. मुलांना तर सगळ्यात जास्त!
हे impulsive behaviour चं स्लो पोईसनिंग , समुदेशनासारख्या सुखसारक वटी चा उपयोग करून योग्य वेळी च दूर करता येईल. कारण डोकं शांत ठेऊन निर्णय घेण्याची क्षमता कोणत्याही मॅनेजमेंट स्कुल मध्ये शिकवली जात नाही !!
Comments
Post a Comment