Self love म्हणजे selfish नाही

एक कँन्सरग्रस्त स्त्री त्या आजारावरचे उपचार घेत होती. त्यासाठी तीला सतत दवाखान्यात जावे लागे. ती एक दिवस अँडमीट होऊन घरी येत असे. या रुटीनमुळे आजाराच्या सुरूवातीच्या काळात ती निराश झाली. आता आपले काही खरे नाही हे तीच्या मनाने जाणले पण औपचारीकता म्हणून ती औषधे घेत असे. एका महिन्याला चेकअप झाल्यावर डाँक्टरांनी तीला सांगितले, " अभिनंदन , तुमच्या तब्येतीत सुधारणा आहे! आता वेळेवर औषधे व स्वत:ची काळजी ईतकचं करा. स्वत:कडे लक्ष द्या."

तीच्या कानात ते शब्द घुमत राहिले 'स्वत:ची काळजी घ्या , स्वत:कडे लक्ष द्या.'
आयुष्यभर , लग्नानंतर जबाबदारी पडली त्यावेळी 'मी' बाजूला ठेवला तो कायमचाच..' माझं' गुंडाळून माळ्यावर ठेवलं ते नेहमीसाठी.. स्वत:वर प्रेम दूरचं लक्ष ही दिलं नाही हो!
कधी आवड निवड सांगायचा प्रयत्न केला की नकळक स्वार्थीपणाचं लेबल चिकटवलं जायचं... ते ही मुद्द्म नाही , पण तिच्या selflessness ची सवय झाली होती.
सतत भावना दाबून ठेवल्याने 'unwanted cells'वाढतात हे तीने वाचलं..
मग ठरवलं की 'नाही ! आता स्वत:वर प्रेम करायचं!!'
आणि ती बदलली.. कायमची..
Self love म्हणजे selfish नाही. कसलाही गर्व नाही फक्त अभिमान स्वत:च्या चांगल्या गुणांचा! हे तीला समजलं आणि मग रिपोर्टस् सतत positive चं येत राहिले.

This article has been published on facebook page 'Spandan'. As I was one of the admins of that page , simply updating this blog with my work.

Comments

Popular Posts