Sports and Emotions

 वाढत्या वयाच्या मुलांसाठी आहारइतकेच शारीरिक शिक्षणाचे सुद्धा महत्व आहे. शारीरिक शिक्षण यासाठी कि शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल झाली कि मेंदूचे त्यांना रिस्पॉन्स देण्याचे काम नियमित होते. आपला मेंदू एखाद्या Ram सारखं काम करतो. cache च्या स्वरूपात last activity त्याला साठवून ठेवता येते. ती ऍक्टिव्हिटी पुन्हा करायला सुरुवात केली कि तशीच्या तशी रेप्रोड्युस करता येते. यालाच आपण 'आठवणं' किंवा 'लक्षात राहणं' असं म्हणतो. पण हि Ram सतत रिफ्रेश करणं सुद्धा गरजेचं असतं .

तर आपण जेव्हा खेळतो तेव्हा प्रामुख्याने 'जिंकणे' हि भावना मेंदूमध्ये सक्रिय असते. काहीही करून 'जिंकणे' आपल्याला गाठायचे आहे या इंस्ट्रक्शन्स मेंदू आपल्याला देतो आणि सगळी उत्तेजक संप्रेरके स्रवतात.
खेळतांना अजून कोणती भावना असते सांगू शकाल का?
मैदानी खेळ खेळताना हात ,पाय, हृदय, फुफ्फुसे आणि मेंदू यांचे कार्य वाढते. आपलं शरीर एखाद्या वाहनासारखं किंवा कार सारखं असतं. कर सुरु होऊन एक विशिष्ट वेग गाठला कि फक्त gears बदलायचे. तसंच , खेळ खेळताना आपापली कामे अवयव सुरु करतात आणि सुरु ठेवतात जोवर आपण थकत नाही म्हणजेच सगळ्यात जास्त क्षमतेने सगळे अवयव काम करत नाहीत तोवर... खेळताना घाम येतो. त्यामुळे शरीरातील नकोशा गोष्टी बाहेर टाकल्या जातात. perspiration क्रियेमुळे तहान लागते व पाणी जास्त पिले जाते. त्याचबरोबर 'घाम निघाला' हे feel केल्यावर मनातील नकोशा गोष्टी सुद्धा बाहेर पडतात. positive फीलिंग्स येतात.
मनुष्य संघटनाप्रिय आहे. त्याला टीमवर्क नैसर्गिकरित्या आवडतं, belonging-ness आवडतो. त्यातून मिळणारं समाधान, ओळख, कौतुक हे सगळं त्याला हवं असतं , म्हणून आमचा संघ जिंकला हे ऐकून , feel करून मानसिक समाधान मिळतं .
म्हणून मुलांना तर खेळायला खूप च आवडतं . त्यांची मैत्री आणि सामाजिक भावना त्यातून चं वाढते! त्याचबरोबर भूक लागणे, उंची वाढणे, वजन कमी होणे , क्षमता वाढणे हे फायदे तर आहेतंच !!

Comments

Popular Posts