आनंद

 आनंद ही  मनातल्या अनेक अवस्थांपैकी एक अवस्था आहे. नक्की काय झालं म्हणजे आनंद होईल हे कोणालाच नीट माहित नाही. 

बायकोला नक्की कशाने आनंद होईल हे काही कळत नाही , काय केलं म्हणजे ती खुश होईल हे कळत च नाही अस म्हणणारे अनेक जण आजूबाजूला दिसतील.  पण प्रत्यक्षात बायकोला विचारलं तर म्हणते कि मला काही नको तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करा आणि लहान सहान इच्छा पूर्ण करा म्हणजे झालं!


गमतीचा भाग सोडला तर खरंच आनंद म्हणजे नक्की काय? 


माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक भावनांप्रमाणे आनंद हि सुद्धा एक जटिल (complex) भावना आहे. 


जसं कि उदाहरणार्थ : शॉपिंग ला जायला मला आवडतं या सध्या वाक्याला सुद्धा बरेच पैलू आहेत. पाहिजे त्या वेळी , पाहिजे त्या ठिकाणी , आणि पाहिजे तसे कपडे किंवा एखादी वस्तू मिळाली तर च शॉपिंग आनंददायी होतं. आणि अर्थातच खिशात पुरेसे पैसे असतील तर!!

यातली एकही गोष्ट मनासारखी झाली नाही तरी आपल्याला पूर्ण मनापासून आनंद होत नाही.. आणि बऱ्याचदा  नक्की कुठे बिनसलंय हे पण आपल्याला समजत नाही.. 


सण उत्सवाच्या वेळी आपल्याला आपोआपच आनंद होत असतो. मन आनंदित च असतं ! रोजच्या कामांमध्ये उत्साह जाणवतो , एरवी किचन मध्ये जायला कंटाळा करणारे पण दिवाळीत वेगवेगळे पदार्थ करून पाहतात! एकूण हॅपी  हॅपी  असा मूड सगळ्यांचाच असतो.

पण तरी दरवर्षी वाटत कि हल्ली पूर्वीसारखी मजा येत नाही. लहानपणासारखी मज्जा आत्ता नाही.. जरी आर्थिक सुबत्ता असली तरी कुठेतरी मन जुन्या किंवा पूर्वी घडलेल्या घटना आठवून च जास्त आनंदी होतं . 

म्हणजेच आपण आपला आनंद वर्तमानाशी न जोडता भूतकाळाशी जोडतो आणि वर्तमानात आनंद व्हावा अशी अपेक्षा करतो! आपल्या मनात त्या विशिष्ट कृतींतून निर्माण होणारी भावना हाच आनंद असतो. आणि त्यामुळे आपण या क्षणामधला (present  moment ) आनंद अनुभवायला विसरतो! 


दिवाळी बद्दल बोलत असू तर मोती साबण , सुवासिक तेल (ते पण विशिष्ट ब्रँड चे) आणि उटणे याशिवाय अभ्यंग स्नानाची कल्पना च आपण करू शकत नाही. हे सर्व आणि सोबतीला पर्फेक्ट गरम पाणी हे जमून आलं कि मगच शुचिर्भूत झाल्याची भावना येते! खूप खूप छान  वाटतं !

पण 

ज्यांना रोजच्या अंघोळीला साधा साबण आणि पुरेसं पाणी मिळणं कठीण असतं  , अशा व्यक्तींना कोणताही साबण आणि किमान कोमट पाणी अंघोळीला मिळाल त्यांना सुद्धा आपल्याइतकाच आनंद होतो!! आपल्याइतकाच उत्साह आणि सुखद भावना त्यांनाही येते. 

कंपनी मध्ये दिवाळी बोनस मिळालेली व्यक्ती आणि दिवाळी म्हणून जास्त पगार मिळालेली आपली घरातली मदतनीस यांच्या चेहऱ्यावर अगदी सेम टू  सेम आनंद असतो!! 


म्हणजेच आनंद हा वस्तूंशी निगडित नसून आपल्या मनाशी आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या आठवणींशी निगडित असतो!


म्हणून च या दिवाळीमध्ये आनंदी क्षणांची आठवण तर काढाच 

पण असे क्षण जगण्यात आणि पुनःपुन्हा निर्माण करण्यातली मजा सुद्धा अनुभवा आणि ती पुढे pass on करा !!


Happy Diwali !

-विभावरी विटकर 


#live_in_present

#happy_moments

#diwali_vibes!

#foretellwellebing


This blog is also published on 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fvibhavari.garkhedkar%2Fposts%2F4703861833006291&show_text=true&width=500" width="500" height="711" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share"></iframe>






Comments