टी टाइम गाणी 1

 इतकं साधं सरळ गाणं आहे हे.. अक्षरश: २ मिनिटात गाणं संपतं .. सगळे सिन सेट वरचे आहेत... दोन्ही अक्टर्स नी कमीत कमी मुव्हमेंट केली आहे. पण तरीसुद्धा गाणं लक्षात राहत.. कशामुळे माहितीये? गाण्याच्या बोलांमुळे..

आयुष्यात बऱ्याच व्यक्तींकडून कटू अनुभव आल्यानंतर एक कोणीतरी ' आपलं माणूस' भेटतं ज्याला म्हणावसं वाटतं , " एक दिन ज़िंदगी इतनी होगी हसीं , मैने सोचा न था!"

माझं आयुष्य जर कोणामुळे सुंदर आणि सुखद असेल तर ते तुझ्यामुळे.. तुझ्यामुळे मी पुन्हा स्वप्न पाहायला शिकलो, पुन्हा माझ्या अलवार विचारांचं झाड बहरू लागलं.. फक्त तुझ्या असण्यामुळे, तुझ्या नजरभेटीमुळे !आणि मग साधा वारा वाहिला तरी ' मदहोश हो जाएंगे ' अशी परिस्थिती झालीये माझी!

हाईट म्हणजे, "जगमगाती हुई जागती रात है" या कडव्यात चांदनी रात दाखवण्यासाठी Welding Sparks चा उपयोग केलाय! इथे मात्र मला 'का?' असा प्रश्न पडला!! तो खोटा खोटा चंद्र, खोटा पूल ज्याचं बांधकाम सुरु आहे, आणि Welding Sparks पडतात तिथे हिरोईन उभी आहे! खऱ्या आयुष्यात असं होणं शक्य आहे का! पण आता प्रेमात पडल्यावर काय, "झूमेगा आसमां गाएगी ये ज़मीं" असं झालाय ना!

येस बॉस मधलं ' I am the best ' , ‘मै कोई ऐसा गीत गाऊ’, ‘चांद तारे तोड लाउ’ ही गाणी कित्ती छान आहेत! , तितकंच हे पण फेमस झालं असतं , बघायला तितकी मजा येत नाही फक्त बोल आणि गायकी यामुळे मला हे गाणं आवडतं .. आणि अर्थातच जुही आणि शाहरुख मुळे.. तुम्हीही ऐका!

https://www.youtube.com/watch?v=HuLT1Z5AKuU

#टी_टाइम_गाणी #चोरकप्प्यातली_गाणी

विभावरी विटकर

Comments