टी टाईम गाणी

 ऐश्वर्या राय; खरं सांगा, जोश मध्ये आणि काजरारे किंवा इश्क कमीना या गाण्यात कितपत सूट झाली आहे?

ती एक ग्रेसफुल ऍक्टर आहे आणि तिला तसेच रोल सूट होतात. उदाहरणार्थ जोधा- अकबर,मोहब्बते,देवदास किंवा ए दिल है मुश्किल यामध्ये ती छान दिसली , तिने चांगला अभिनय केला आणि तिला एकूण तो लूक सूट सुद्धा झाला...

जोश मध्ये freak आणि funky मुलीच्या कॅरॅक्टर मध्ये तिला बघताना विचित्र च वाटत.. शाहरुख ने as usual उत्तम performance दिला आहे..

तिची उंची , गोरा रंग, wavy hair आणि तिचे छोटे कॉस्ट्यूम यामुळे ती funky न वाटता थोडी टपोरी टाईप वाटते जे तीच कॅरॅक्टर आहे सिनेमा मध्ये, फक्त तिला ते नीट carry नाही करता आलंय!

"मेरे खयालो कि मलिका" माझं तेव्हाच आवडतं गाणं होतं .. मला आवडायचं ते जसं दाखवलंय त्यामुळे.. चंद्रचूडसिंग कसा तिच्या मागे मागे जातो सगळीकडे, ती त्याला जागोजागी दिसते.. मला हे खूप सही वाटलं होतं तेव्हा ; अजूनही आवडत.. Stalking मुलींना secretly आवडत असतं ....

गाणं दर्शनीय तर आहेच पण त्यापेक्षा श्रवणीय आहे जास्त.. रेडिओ मिर्ची वर हे गाणं लागलं कि, मी सगळं सोडून ऐकत बसायचे.. अभिजित भट्टाचार्य ने गायलंय .. lyrics समीर चे आहेत. अनु मलिक च music आणि ऐश - चंद्रचूड pair हे जरा odd man out आहे! फुटबॉल च्या बॉल ने व्हॉलीबॉल खेळणे, पूर्ण काळ्या रंगाची कोळी डान्स ची साडी या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत!

इतक्या त्रुटी असून हि शांत आणि एव्हरग्रीन असं हे माझं या लिस्ट मधलं गाणं ...

https://www.youtube.com/watch?v=KHjYwFBkF0o

#टी_टाईम_गाणी #चोरकप्प्यातली_गाणी

विभावरी विटकर

Comments