नर्कचतुर्दशी

 आत्ताच दिवाळी झाली.... दिवाळी झाली तरी अजून तो मूड गेला नाहीये.... अजूनही छान छान वाटतंय, सगळीकडे आकाशकंदील आणि lighting अजूनहि काढली नाहीये.  मस्त थंडी पडलीये.... धुकं पडतंय आणि सकाळी सकाळी romantic वातावरण असत.... लहान मुलं आणि बाळांचे आई वडील अजून हि संध्याकाळी फटाके उडवतायेत!

या वातावरणाला साजेशी अशी गोष्ट म्हणजे माझा पहिला दिवाळसण! धुक्यात गुरफटलेला! नर्कचतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नानाच्या दिवशी मी कोल्हापूर ला होते.... ज्या दिवशी नवर्याला तेल लाऊन अंघोळ घालायची त्या दिवशी मी कंपनी च्या कामाच्या निमित्ताने कोल्हापूर ला होते.....

नवीन कंपनी मधली पण हि पहिली दिवाळी!! अर्थात च कंपनी ची इच्छा असणार मी तिच्यासोबत थोडा वेळ काढावा, तिच्याबद्दल जाणून घ्यावं! मग काय.... गेले! आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाच हा च इतिहास ऐकत मोठे झालो न आपण!

गेल्या गेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई च दर्शन घेतलं आणि factory पाहायला निघालो. तिथे पोहचल्यावर पाहिलं तर आधी ची मीटिंग संपली नव्हती. ती संपेपर्यंत मी आणि अमित factory पाहायला गेलो. Production Line वर शोभणारे 5S, 3F, 3M यांचे फलक लक्ष वेधून घेत होते. सगळ्या workers ना उपदेश देण्यापेक्षा असे motivational फलक लावण्याची पद्धत मला आवडली. आम्ही सगळी line पहिली, सर्व उपकरणांनी युक्त अशा ट्रेनिंग classrooms पहिल्या. कॅन्टीन मधलं झटकेबाज कोल्हापुरी जेवण करून तृप्त झाल्यावर आम्ही निघालो.

Happy Diwali वाला मूड जोर धरत होता आणि त्यातच सरांनी परवानगी दिल्यामुळे, मी भट सर आणि अमित निघालो कणेरी मठाकडे! संध्याकाळ पूर्ण तिथे घालवली आणि ट्रेन सुटायच्या एक तास आधीच स्टेशन वर येऊन पोहचलो. अशी आमची ट्रीप छान झाली. satisfactory!

या दोन दिवसात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या. त्यापैकी उल्लेख करावा अशा दोन गोष्टी मी इथे सगळ्यांना सांगते.

प्रसंग 1:

मीटिंग सुरु झाल्यावर नेहमीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांना दोन शब्द बोलायला सांगितले. त्यामध्ये अमित गुप्ता सरांनी केलेलं शोर्ट स्पीच खरंच short and sweet होतं. त्यांनी सांगितला कि आम्ही खूप दिवस पहिले, काही बरे काही वाईट या दिवसांनी आम्हाला निर्णय घ्यायला शिकवलं. आम्हाला अडचणी आल्या पण त्यामध्ये आम्ही थांबलो नाही. एक निर्णय घेऊन त्याला चिकटून राहिलो आणि वाटचाल केली आणि आज जिथे आहोत तिथे येऊन पोहचलो. या वाटचालीत आम्ही प्रत्येकाचे चुकीचे आणि बरोबर निर्णय as a team share केले. दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही नेहमी चांगले लोक हेरले आणि त्यांच्याशी संबंध ठेवले. आणि असेच लोक गोळा करत करत आज हे एवढे चांगले लोक आमच्या गाठीला आहेत. हे छोटा स्पीच खूप काही शिकवून गेलं. आपल्या जवळ असणाऱ्या चांगल्या वाईट manpower ला कसं motivate काराव हे त्यातून शिकायला मिळालं. आणि माझ्या सोबतचे लोकांचे फक्त चांगलेच गुण मी पाहणार हि committment!

प्रसंग 2:

आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशन वर एक तास आधी येऊन पोहचलो. आणि गप्पा मारत बसलो होतो. येताना आम्ही कॅन्टीन मधून रात्रीच जेवण pack करून घेऊन आलो होतो आणि ती पिशवी आणि आमच्या bags बाजूला ठेवल्या होत्या. गप्पा मारता मारता वेळ आरामात निघून गेला. ट्रेन आली तशी आम्ही घाईघाईने ट्रेन मध्ये बसलो. ट्रेन सुटायला अजून 5 मिनिटे होती. तेवढ्यात एक माणूस घाईघाईने आला आणि जणू आम्हाला च शोधात होता अशा अविर्भावात त्याने सोबतच्या माणसाला सांगितलं हे बघ हे च ते, यांना डे ती पिशवी. आणि त्याने आम्हाला आमच्या जेवणाचीपिशवी दिली! तो म्हणला सर तुम्ही बोलत होतात न ते ऐकला आणि  ट्रेन मध्ये AC compartment शोधात आलो, आत्ता सापडलात. इतकं बर वाटला बोलणं ऐकून. अजूनही चांगले आणि मदतगार लोक जगात आहेत याची पुन्हा खात्री पटली. बर एवढ झालं आणि आम्ही जेवलो. थोडा अन्न उरलं होतं, सरांना म्हणले सरसगळं पुन्हा pack करा, मुंबई ला जाऊन कोणाला तरी देऊ, खराब होणार नाही. पण सर just try म्हणून मिरज ला उतरले कोणी गरजू सापडता का ते पाहायला. आणि काय आश्चर्य! लगेच एक बाई दिसली तिला दिला आणि सर आले पुन्हा ट्रेन मध्ये! योग्य हातात योग्य वस्तू गेली. माझ्या तोंडून एक च वाक्य बाहेर पडलं-----

“Everything that starts with good , goes through good and ends with good”

आमची नर्कचतुर्दशी अशी साजरी झाली! वाईट विचारांवर विजय मिळवून!

Comments