कत्थई आखों वाली एक लडकी

 कत्थई आखों वाली एक लडकी

हे गाणं ऐकलं तेव्हा कत्थई शब्द माहीतच नव्हता ..फक्त वाटलं कत्थई म्हणजे काथ्याचा रंग असेल म्हणून... पण एवढा विचार केलाच नाही तेव्हा....

मग नंतर ; कधीतरी ; मोठे झाल्यावर , समजायला लागल्यानंतर पुन्हा असंच कधीतरी ते गाणं ऐकण्यात आलं.. तसं फेमस गाणं नव्हतं ते!

त्या वेळेला सगळ्यात पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे शाहरुख आणि जुही दोघांचेही डोळे कत्थई रंगाचे दाखवले आहेत आणि गाण्याच्या सुरुवातीला त्यांचे कपडे सुद्धा त्याच रंगाचे दाखवले ... नंतर पुन्हा कोणत्या गाण्यात आलाय का हा शब्द?

सगळे कलर्स फ्रेश आणि प्लेन आहेत. सगळे सिन आणि लॅण्डस्केप्स टिपिकल ९०'s सॉंग्स सारखे आहेत खरं तर .. मागे डोंगररांग, आणि पोपटी रंगाच्या गवतावर ऍक्टर्स डान्स किंवा रोमान्स करताहेत.. पण आपल्या शाहरुख आणि जुही मुळे गाणं पाहताना मजा येते, म्हणजे कंटाळा येत नाही.

हे गाणे एक ड्रीम सिक्वेन्स आहे,, वाइन टेबल पासून सुरू होऊन वाइन टेबल पाशीच ड्रीम सिक्वेन्स थांबतो ..

बबली जुही आणि नॉटी शाहरुख यांना , फॉर अ चेंज, सिम्पल आणि साधे-सरळ दाखवल आहे. तरीपण या सिनेमा मधला डुप्लीकेट शाहरुख च मला खरा शाहरुख वाटतो!

USP of the song अर्थातच कुमार सानू चा आवाज!

Limited sensuousness , unlimited simplicity आणि superb music म्हणजेच CCD मधल्या cool blue किंवा blue sparkler ड्रिंक सारखं हे सॉंग ! Refreshing!

https://www.youtube.com/watch?v=_JyNY_uXXeI

#टी_टाइम_गाणी #चोरकप्प्यातली_गाणी

विभावरी विटकर

Comments