ताल
ऐश्वर्या राय कोणाला आवडत नाही! सगळ्यांना आवडते; personality च तशी आहे... ब्युटी विथ ब्रेन , ग्लॅमर इ. इ. आणि तिचा को-स्टार अक्षय खन्ना !
सुभाष घई आणि संजय लीला भंसाली यांना का बरं वाटलं असेल की अक्षय खन्ना अजय देवगन ऐश्वर्या रायला को स्टार म्हणून सुट होतील! Anyway ...
ताल मधली सगळीच गाणी खासच जमली आहेत पण त्यातूनही इश्क बिना या गाण्यासारखे नजाकत दुसरी दुसऱ्या कुठल्या गाण्यात नाही.. अर्थात प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा आहे म्हणा !
त्या गाण्यातली रंगसंगती , एक प्रकारचा तो डीम लाईट त्याच्यामधले फिक्या रंगाचे कपडे, फिक्या रंगाचा मेकअप केलेली ऐश्वर्या सगळं कसं फिकं फिकं... पण lyrics मात्र गहिरे आहेत.. Rather त्यामुळेच ते गाणं खूप छान उठून दिसत....
मुलांचे कॉस्च्युम रेड ,ऑलिव्ह , ब्लू, ग्रे या रंगाचे आणि मुलींचे लेमन, पिंक ,ग्रीन, पीच , व्हाइट रंगाचे. याला कॉन्ट्रास्ट म्हणजे ऐश्वर्याचा फुल ब्लॅक कलरचा ड्रेस आणि अक्षयचा ग्रे कलर चा कोट... मुलांची ती सिमेट्रीकल स्टेप्स वाली फ्रेम पण एकदम भाव खाऊन जाते...
अक्षय खन्ना या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे हे कपड्यांवरुन सुद्धा या गाण्यामध्ये लक्षात येतं.. आणि अगदीच नाही म्हणायला अक्षय खन्ना चा इनोसन्स, त्याच्या गालावर पडणारी खळी या गोष्टी ऐश्वर्याच्या घाऱ्या डोळ्यांना एकदम परफेक्ट मॅच झालेत
एक तो सेम बॉटल मधून कोकाकोला प्यायचा सीन सोडला तर असा खास लक्षात राहण्यासारखं काही नाही पण तरीही गाणं लक्षात राहतात ते त्याच्या सिंपलिसिटी मुळे.आणि तोच धागा पकडून पुढे female version केलंय या गाण्याचं...
कधीही बघितलं तरी मूड फ्रेश करून टाकणार हे गाणं माझ्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं !
https://www.youtube.com/watch?v=-zVkMzF7S1I
एखादं गाणं आपल्याला का आवडेल याचा काही Particular कारण नसतं.. कधी आपल्याला त्या गाण्याचे Lyrics आवडतात कधी त्याचं म्युझिक, कधी हिरो-हिरॉईन ची जोडी, तर कधी सिनरी.माझ्या आवडीची अशीच काही गाणी ... का आवडतात ते मला माहित नाही पण ती आवडतात.. फ्रेश लाईट एकदम साधी सिंपल सरळ गाणी आहेत. या सगळ्या गाण्यानंबद्दल मी लिहायचा प्रयत्न करणारे आजपासून पाच दिवस एका सीरिजमध्ये
#टी_टाइम_गाणी #चोरकप्प्यातली_गाणी
Vibhavari Vitkar
Comments
Post a Comment