पहिले प्रेम , लग्नाआधीचे......

 हा सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. ती हुरहूर , ती स्पेशल फिलिंग सगळ्यांना खूप खूप आवडत असते. अगदी त्या प्रेमाला कितीही वर्षे झाली आणि त्याच्या कितीही आवृत्त्या झाल्या तरीही.... ते प्रेम पूर्णत्वाला पोहचू शकलं नाही तरीसुद्धा! (पूर्णत्वाची व्याख्या स्थलकालापरत्वे बदलू शकते..)

आपल्या BF किंवा GF चा पझेसिव्हनेस , किंवा एखादी सवय किंवा चिल्ड आऊट स्वभाव किती आवडत असतो ना आपल्याला! हे सगळे सुरु असताना आपल्याला पुढे कायहोणार आहे याची साधारण जाणिव झालेली असते. आपण पुढे एकत्र राहू शकु कि नाही हे समजलेले असते. आपल्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीमधील अंतर किंवा समानता आपल्याला समजलेली असते.

अशातच , दोघांपैकी एकाची लग्नाची जुळवाजुळव सुरु होते , ठरतेही... कितीही , 'माहित होते' किंवा 'वाटलेच होते' असे म्हणले तरी दुसऱ्याला धक्का बसतो. तो जरा उध्वस्त झाल्यासारखा होतो. कालांतराने दीड दोन वर्षाने तो पण ,मूव्ह ऑन होतो.... या आहेत आपल्या किंवा मित्र मैत्रिणींच्या किंवा भाव बहिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ..

आता .....

याच्या पुढची स्टोरी, जी हिंदी सिनेमामध्ये दाखवतात ती म्हणजे बदला किंवा ज्याचे लग्न ठरले आहे त्याचा समजूतदार जोडीदार त्याला म्हणतो , तू तुझ्या प्रियकर किंवा प्रेयसीकडे परत जा... (१९९० चे दशक)

किंवा

उरलेली व्यक्ती इंडीपेंडन्ट होते आणि स्वतः च अस्तित्व निर्माण करते (२००० चे दशक)

किंवा

उरलेली व्यक्ती फिलॉसॉफर आणि फिलांथ्रोपिस्ट होऊन NGO किंवा तत्सम काहीतरी करते (साऊथ इंडियन / मराठी सिनेमा)

यापुढची रिऍलिस्टिक स्टोरी बघायची असेल तर 'धडकन' हा सिनेमा बघावा. या स्टोरी मध्ये एवढा दम आहे कि अभिनयापेक्षा हि स्टोरी जास्त लक्षात राहते.

'देव' च्या कॅरेक्टर मध्ये बेदरकारपणा आहे. लहानपणापासून आजूबाजूचं स्वार्थी जग जवळून पाहिल्यामुळे आलेला स्वार्थीपणा आहे. 'गरीब आहे पण मानी आहे. असा संदेश देणारे डायलॉग्स आहेत. गर्भश्रीमंत लोकांबद्दल चीड आहे. स्वतःपेक्षा जास्त कुवत आणि शक्ती असणार्यांबद्दल असूया आहे.

कामापुरता प्रामाणिकपणा व बेरकीपणा यांचं योग्य प्रपोर्शन आहे. या सगळ्यामुळे 'देव' हा एक सॉफ्ट व्हिलन आहे. खरा तो व्हिलन नाहीच ; केवळ समाजाच्या मानसिकतेचा आणि व्यवस्थेचा बळी आहे आणि ती झुगारु पाहणारा एक स्ट्रगलर आहे.

'अंजली ' चे कॅरेक्टर तर फार छान डिफाइन केले आहे.

ती एक साधारण भारतीय स्त्री आहे. ती जरी गर्भश्रीमंत वडलांच्या पोटी जन्माला आली तरी तीचा स्वभाव इंनोसेण्ट आहे. जिथे प्रेम मिळेल तिथे तिला समाधान आहे. आई वडिलांचे ऐकण्याची तिची तयारी आहे. आणि इतकं असूनही 'हे होणारच होतं' हे समजण्याइतपत ती मॅच्योर आहे. लग्नानंतर नवरा हेच सर्वस्व मानणारी, सासू आणि दीर नणंदेला जरा घाबरून असणारी, प्रेमासाठी फक्त नवऱ्यावर अवलंबून असणारी हि अंजली... वडील श्रीमंत असूनही सासूने चारित्र्यावर संशय घेतल्यावर ती वडिलांकडे जायची भाषा करत नाही. फक्त नवऱ्याने तिच्यावर विश्वस ठेवायची वाट पाहते.

पुढे पुढे सिनेमा पाहताना अंजलीने देव सोडून राम शी लग्न केल्याचं समाधान चं वाटतं.

'राम' च्या कॅरेक्टर ला तसे फार कंगोरे नाहीत. फक्त बायकोवर प्रेम करणारा , मेहनती, यशस्वी आणि संयमी असा हा राम , भावनिक आधारासाठी मात्र बायकोवर पूर्ण अवलंबून आहे. तिच्या सुखासाठी तो काहीही करायला तयार आहे!!

'देव' चा अंजली साठी असणारा मॅडनेस हा राम च्या संयमी स्वभावासमोर कमी पडतो. हा सिनेमा अशा घटनेवर येऊन संपतो कि तिथे नक्की कोण जिंकलं, कोण सुखी आहे, कोण दुःखी आहे याचा निर्णय करताच येत नाही. महिमाच्या कॅरेक्टर चा जेलस स्वभाव या सगळ्याला पूरक ठरला आहे.

'अकसर इस दुनिया मे अंजाने मिलते है...... ' हे गाणं जरा निगेटिव्ह टोन असूनही आवडून जातं .... पटतं ......

अंजली चा इनोसन्स

देव चा पझेसिव्हनेस

राम चा पेशन्स

शीतल ची जेलसी

या चार इमोशन्स वर हा सिनेमा मजबूत उभा राहिला आहे.

'मुश्किल अशको को छूपानालगता है ..... ' अशी आपलीही अवस्था सिनेमा संपताना झालेली असते

Comments

Popular Posts