DCH
DCH आठवतो ना? There are no 90s kids who doesn’t know DCH.
फरहान अख्तरला त्याच्या सिनेमा मधले कॅरेक्टर्स फ्री स्पिरिटेड दाखवायला आवडतं ... पण DCH मधल्या तिघांसारखे, ना पुन्हा जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये जमले ना Rock On मध्ये..DCH is one of its kind..
काय माहित किती मुला मुलींनी स्वतः ला आणि स्वतःच्या बेस्ट फ्रेंडला DCH च्या रुपात बघितल असेल.. त्यातला अक्षय खन्ना चं जरा वेगळ कॅरेक्टर आहे.... वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीच्या प्रेमात पडतो; तो खूपच मॅच्युअर्ड लवर दाखवला आहे..
तुम्ही नीट Observe केलं तर लक्षात येईल की तिन्ही कपल्स च्या Love Songs मधे एक प्रकारचा मुक्तपणा आहे.. पण हे गाणं तरीही वेगळच बर का .... कैसी है रुत गाणं जरा वेगळ आहे.... बऱ्याच जणांना कदाचित आवडत नसेल हे गाणं..
मुळात अक्षय कुमारला प्रेम एका चौकटीत बांधून ठेवायचंच नाही. त्याच्या साठी प्रेम म्हणजे चांदनी, झरने, घटाये, गीत, बारिश, तितलिया..... म्हणूनच डिंपल कपाडिया जेव्हा पांढऱ्या साडीमध्ये त्याच्यासमोर येते ; त्याला एकदम परफेक्ट वाटते ती.. कुठल्याही फॉर्म मध्ये कुठल्याही कलर मध्ये मिक्स होणारी.. आणि मग तो दिवस रात्र मेहनत करून तिचं सुंदर पोर्ट्रेट बनवतो.. यातून त्याच्या प्रेमाचा आणि प्रेमाच्या कन्सेप्ट वरचा विश्वास आणि दृढता दिसून येते किंवा तसं दाखवायचा प्रयत्न केला आहे.
फारच सिंबोलिक बनवले आहे हे गाणं.. ती जेव्हा सिग्नेचर कर असं म्हणते , तेव्हा तो फक्त अंगठ्याचा ठसा उमटवतो म्हणजेच त्याला वेगळ अस्तित्व काही दाखवायचं नाहीये.. त्याचा मॅच्युअर्ड स्वभाव पुन्हा एकदा दिसतो येथे.... खरंच असतात असे लव्हर्स?
कुठलीही दिवार नसलेली ही प्रेमाची निराली दास्ता फरहान अख्तरने मस्त दाखवली आहे .. थोडसं दुर्लक्षित पण तरी अर्थपूर्ण असं हे गाणं....
https://www.youtube.com/watch?v=XBr11cQDg-E
#टी_टाइम_गाणी #चोरकप्प्यातली_गाणी
विभावरी विटकर
Comments
Post a Comment