प्रेम , माणूस कि प्रेमाचं माणूस?
बिन पूछे मेरा नाम और पता
रस्मो को रख के परे
चार कदम बस चार कदम
चल दो न साथ मेरे
माणसाला आनंदी रहायला काय हवं असतं ?
प्रेम , माणूस कि प्रेमाचं माणूस?
मला वाटतं , प्रेमाचं माणूस. प्रेम करणारी व्यक्ती जर नावडती असेल तर आपण ते नाकारतो.
आणि सोबत असलेल्या व्यक्तीचं जर आपल्यावर प्रेम च नसेल तर?
आयुष्यभर प्रेम नसलेल्या माणसांसोबत राहताना, जगताना , त्यांना आनंदी ठेवतां किती ओढाताण होत असेल? असं म्हणतात प्रेम सहवासाने वाढतं . माणसाच्या आवडीनिवडी कळल्या कि आपण स्वतः ला आपोआप adjust करून घेतो. त्यांच्या choices सांभाळतो आणि स्वतःला विसरतो. म्हणजे एका अर्थाने आपल्या सख्या सोबत्यांमध्ये स्वतःला मिसळून टाकतो. त्या व्यक्तींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो , attach होतो आणि यावरून आपल्याला आणि त्या व्यक्तीलाही वाटतं एक एकमेकांवर आपलं प्रेम आहे. एका मार्गावरून प्रवास सुरु होतो.
प्रत्येक नात्यामध्ये give and take असतं असं आपण म्हणतो ; पण तरी कोणीतरी एकजण हा नेहमी देणारा आणि एक जण नेहमी घेणारा असतो. Exchange of gestures किती वेळा होतं ?
आणि मग अशा मार्गावरून जात असताना अचानक एक व्यक्ती आपल्याला भेटते. आपल्याला आपल्या अस्तित्वाची पुन्हा जाणीव करून देते. किंवा काही वेळा, स्वतः च्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर आपण स्वतः अशा व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. ती व्यक्ती सापडली , vibes match झाल्या की जीवनाचा वेगळाच आनंद मिळायला सुरुवात होते. तो आनंद, ते समाधान , शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे. समुद्राच्या लाटा संथपणे किनाऱ्यावर धडकताना बघितल्यावर जो निवांतपणा जाणवतो , तो या नव्या नात्यातून मिळतो आणि एक समांतर मार्गक्रमण पुन्हा सुरु होते.
माणसाचं मन इतकं मजेशीर आहे! आपल्याला वाटतं असं आहे तेव्हा मन वेगळ्याच धुंदीत असतं . आपल्याला जेव्हा सहवास हवा असतो तेव्हा ज्यांच्याशी विचार जुळतात अशा व्यक्ती आजूबाजूला असतात आणि जेव्हा विचार जुळणार कोणीतरी हवं असं वाटत तेव्हा सहवासातल्या व्यक्तीशी ते नेमके जुळत नसतात!
पुन्हा नवा शोध.. चार पावलं चालल्यावर नवी गरज.. हे करत असताना जुळवलेल्या नात्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, रीती , रिवाज, इच्छा - अपेक्षा, रागावणे - रुसणे !! उफ्फ!
या वेळी गाण्याचे हे बोल ऐकून , आपल्याला नक्की काय हवंय ते समजतं ...
बिन कुछ कहे , बिन कुछ सुने
हाथो मे हाथ लिये
चार कदम बस चार कदम
चल दो ना साथ मेरे!
या comfort समोर , freedom समोर, समजदारपणासमोर आयुष्यात दिल्या घेतलेल्या अनेक शपथा फिक्या पडतात!
कधी कधी न घातलेल्या बंधनाचे बंधच आयुष्याचा वेगळा , समृद्ध करणारा आनंद देऊन जातात!!
- विभावरी
Comments
Post a Comment